लसीसाठी सोशल डिस्टन्स ठेवून चप्पल रांगेत, औरंगाबादकरांची शक्कल, स्वत: सावलीत घोळका

0 3

औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लसीकरणासाठी (Aurangabad vaccination) गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र आज औरंगाबादकरांनी रांग लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सोशल डिस्टन्समध्ये प्रत्यक्ष उभं राहण्याऐवजी, रांगेत चप्पल ठेवण्यात आली.

 

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा लसीकरणासाठी (Aurangabad vaccination) गर्दी झाल्याचं चित्र आहे. मात्र आज औरंगाबादकरांनी रांग लावण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. सोशल डिस्टन्समध्ये प्रत्यक्ष उभं राहण्याऐवजी, रांगेत चप्पल ठेवण्यात आली. आपला नंबर आल्यानंतर चपलाजवळ येऊन ती पुढे सरकवायची असा प्रकार करण्यात येत आहे. चपला रांगेत आणि संबंधित व्यक्ती सावलीत, असं चित्र आज औरंगाबादेत पाहायला मिळालं. (Chappals in queue for corona vaccine at Aurangabad Maharashtra)

राज्यात जसा लसींचा तुटवडा जाणवत आहे, तसाच औरंगाबादमध्येही आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. काल तर औरंगाबादेतील लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरीची परिस्थिती होती. अनेकजण पहाटेपासून रांगा लावत आहेत, मात्र त्यांना विनालस घेता परतावं लागत आहे.

लसीकरण केंद्रावर चेंगराचेंगरी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर एरव्ही ओस पडलेल्या लसीकरण केंद्रांवर आता मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे धक्काबुक्की ,रेटारेटी झाल्याचा प्रकार वाळूजमध्ये 28 जून रोजी पहायला मिळाला. यात काही लोकांना किरकोळ इजासुद्धा झाली. या लसीकरण केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र पोलिसांनाही इथली गर्दी हाताळता आली नाही. वाळूजमधील बजाजनगर लसीकरण केंद्रावर आज नियोजनाचा मोठा अभाव पाहायला मिळाला. इथं झालेल्या गर्दीमुळे लोक लस घेण्यासाठी आले होते, पण त्यांना कोरोनाची लागण होण्याचीच शक्यता अधिक आहे, असं चित्र निर्माण झालं होतं.

नागरिकांना टोकनचे वाटप

लस तुटवडा निर्माण झाल्यामुळे रांग लावूनही टोकन मिळत नसल्यामुळे औरंगाबाद शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.  बजाजनगर येथील लस तुटवड्याच्या बातमीनंतर आता येथे तत्काळ लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना टोकन वाटण्यात आले असून काहींचे लसीकरण झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.