..म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार; ट्विट करून दिली याबाबत सविस्तर माहिती

0 4

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशातच ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने राज्य सरकारने केंद्राकडे याबाबत मागणी केली होती. पण अशावेळी केंद्र सरकारने गेल्या ४८ तासांत ५ महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.

१ मे पासून १८ वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २२ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत उद्योगांच्या ऑक्सिजन पुरवठ्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या किंमतीत दोन दिवसांपूर्वी कपात करण्यात आली होती. तसेच अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने रेल्वे मंत्रालयाने ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांनी cmo महाराष्ट्राच्या ऑफिशिअल ट्विट हँडल वरून एक ट्विट केले आहे. ज्यात ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वीच मी देशातील २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून १८ वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला, त्यासाठी प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो.” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणले आहे.

दरम्यान, राज्यात लसीकरणाच्या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.