China Rocket जगाचे एक टेन्शन संपले! चीनचे रॉकेट ‘या’ ठिकाणी कोसळले

china rocket reentered earth : अंतराळात अनियंत्रित झालेले चीनचे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत आले असून हिंदी महासागरात कोसळले आहे. चिनी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.

0 84

बीजिंग: नियंत्रण गमावलेले चीनचे रॉकेट काही तासांमध्ये पृथ्वीवर कोसळले असल्याची माहिती चिनी माध्यमांनी दिली आहे. चिनी माध्यमांनुसार, नियंत्रण कोसळलेले रॉकेट हिंदी महासागरात कोसळले आहे. त्यामुळे आता अनेकांना सुटकेचा निश्वास सोडला आहे.

अमेरिकन स्पेस फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, हे रॉकेट १८ हजार मैल प्रति तास या वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होते. बीजिंगमधील स्थानिक वेळ सकाळी १०.२४ वाजण्याच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेत आले होते. हिंदी महासागरात या रॉकेटचे अवशेष कोसळले असल्याचे वृत्त चिनी माध्यामांनी चीनच्या

अंतराळ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. रॉकेटचे अवशेष भारत-श्रीलंकेच्या दक्षिण-पश्चिम भागात हिंदी महासागरात कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पृ्थ्वीच्या वातावरण कक्षेत शिरत असताना रॉकेटचा बहुतांशी भाग जळून खाक झाला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रॉकेटचे अवशेष मालदीवच्या हद्दीत कोसळले आहेत.
रॉकेटचा हा तुकडा जमिनीवर कोसळण्याऐवजी समुद्रात कोसळण्याची शक्यता अधिक होती. चीनचा 2021-035B हे रॉकेट १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद आहे. आतापर्यंतच्या अंदाजानुसार हे रॉकेट दक्षिण-पूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनेझुएला, दक्षिण युरोप, उत्तर किंवा मध्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलियाजवळ कोसळण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.
अमेरिकेच्या अंतराळ स्थानक केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू झाला आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे २१ टन वजनाचे ‘लाँग मार्च ५ बी’ श्रेणीतील रॉकेट लाँच केले होते. अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होते. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्याने चिंता वाढली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.