संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा, अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते; चित्रा वाघ यांचा इशारा

0 13

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते. (sanjay raut)

 

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे. (chitra wagh slams sanjay raut over comments on smriti irani)

चित्रा वाघ यांनी ट्विट करून त्यांनी हा इशारा दिला आहे. संजयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन. आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

म्हणून राणे शिवसेनेला झेपले नाही

राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उंची मोठी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राणेंच्या कर्तृत्वाची उंची खूप मोठी आहे, असं कधी नव्हे ते तुम्ही खरे बोललात. राणेंच्या कर्तृत्वाची उंची वाढतच राहणार आहे. म्हणूनच तर शिवसेनेला ते झेपलं नाही, असा टोला लगावतानाच असो मी पण अपेक्षा करते की आपल्या बंधूलाही लवकरच मंत्रीपद मिळेल. जेणे करून आपल्यालाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आभार मानण्याचे सौभाग्य प्राप्त होईल, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

राऊत काय म्हणाले होते?

दरम्यान, पालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. काल पर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखराल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळलं की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायची. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळायचे आहे. म्हणून तो चित्रपट आला होता. शिक्षणाचा आयचा घो. बरोबर आहे ते, असं राऊत म्हणाले होते. (chitra wagh slams sanjay raut over comments on smriti irani)

Leave A Reply

Your email address will not be published.