शेगांव शेतशिवारात ५२ ताशपत्ता जुगारावर शहर पोलिसांचा छापा,२ लाख २३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बादशहा नावाचा जुगार खेळतांना एकुण ४ जणांना अटक

0 37

शेगांव : शहरातील शेत शिवारांमध्ये ५२ ताश पत्याचा एक्का, बादशहा नावाचा जुगार खेळतांना एकुण ४ जणांना अटक करुन त्यांच्याकडून २ लाख २३ हजार ३८० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

शेगांव शहराचे पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली डि.बी पथकाने काल शनिवारी संध्याकाळी उशिरा ही कारवाई केली. विशेष म्हणजे शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालू असलेल्या अवैध धंद्याविरूद्ध दररोज कारवाईचा बडगा शहर पोलीस डि बी पथकाने उगारला आहे. त्यामुळे या भागातील अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे.

एएसआय लक्ष्मण नारायण मिरगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस उपनिरीक्षक योगेश कुमार दंदे यांना मिळालेल्या माहितीवरुन डि बी पथकाने काल शनिवारी दि. १ मे रोजी संध्याकाळी ५:३० वाजताच्या सुमारास शेगाव शहरातील शेत शिविरामधे एक्का बादशहा नावाचा जुगार सुरु होता.

त्यामध्ये पद्माकर प्रल्हाद राठी वय ५० वर्ष राहणार मोदिनगर शेगांव, उमेश साहेबराव शिरसाट वय ३५ राहणार बाबुळगाव जहागीर जिल्हा अकोला, संजय विश्वनाथ खरे वय ४२ राहणार जिजामाता नगर शेगांव, ज्ञानदेव रघुनाथ घाटे वय ५९ राहणार सांगवा तालुका शेगाव यांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणाहून नगदी १२ हजार ५३० रुपये, ४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि ४ वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकली ५२ ताशपत्ते,चादर असा एकूण २ लाख २३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

या सर्वांविरुध्द शेगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदया अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई डि बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश कुमार दंदे, लक्ष्‍मण मिरगे, विजय साळवे ,उमेश बोरसे, हरिचंद्र बारवाल यांनी ही कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.