मास्क न वापरण्यात शौर्य कसलं?; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

करोना मास्क वापराच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सणसणीत टोला हाणला आहे. (Uddhav Thackeray Taunts Raj Thackeray)

0

हायलाइट्स:

  • करोना मास्कवरून उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला
  • मास्क घालण्यात लाज कसली?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
  • लसीकरणानंतरही मास्क घालण्याचं केलं आवाहन

मुंबई: करोना रुग्णवाढीचा आकडा ४० हजारांच्या पुढं गेल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. तत्पूर्वी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला सर्व प्रकारची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मास्कच्या वापरावरून मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. (Uddhav Thackeray Taunts Raj Thackeray)

Leave A Reply

Your email address will not be published.