महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन?; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत

"त्याशिवाय निरपराध लोकांचे प्राण वाचवू शकत नाही"

0 3

करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून वीकेण्ड लॉक़ाउनची घोषणा कऱण्यात आली आहे. एकीकडे व्यापाऱ्यांकडून निर्बंधाला विरोध होत असताना विरोधकांकडूनही निर्बंध शिथील करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लागू करणयाचे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

आजपासून विकेण्ड लॉकडाउन सुरु होत असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “विकेण्ड लॉकडाउनची आवश्यकता होती. रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही हे पहावं लागेल”.

पुढे ते म्हणाले की, “परिस्थिती हाताळण्यासाठी कितीही उपाययोजना केल्या तरी मनुष्यबळ कमी पडणार आहे. डॉक्टर, नर्सेस कमी पडतील. साडे पाच हजार डॉक्टर जे आता अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना ठिकठिकाणी कामाला लावत होतो, तरीदेखील मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे वीकेण्ड नाही तर मी मुख्यमंत्र्यांना तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्यास सांगणार आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.