एखाद्या आरोपीला खूप श्रीमंत आहे म्हणून सवलत देता येऊ शकत नाही : सुप्रीम कोर्ट

0 19

एखादा आरोपी खूप श्रीमंत आहे म्हणून त्याला सवलत दिली जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हिट अँड रनच्या एका खटल्यात सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती किशन कौल व न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या पीठाने हा निर्वाळा दिला. कोलकाताचे बिर्याणी चेन आर्सलानचे मालक अख्तर परवेज यांच्या अर्जावर सुनावणीदरम्याने कोर्टाने हे निरीक्षण मांडले. १६ ऑगस्ट २०१९ रोजी परवेझ यांचा मुलगा रागिब भरधाव गाडी चालवत होता. तेव्हा त्याची गाडी दुसऱ्या गाडीला धडकली होती. त्यात जवळ उभ्या दोन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता.

परवेजच्या वडिलांनी न्यायालयासमोर मुलाची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे त्यास तुरुंगात पाठवू नये, अशी विनंती केली होती. परंतु त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. कारण घटनेच्यावेळी रागिब १३० ते १३५ किमी वेगाने गाडी चालवत होता. सात महिन्यांत त्याने ४८ वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला सवलत हवी आहे. परंतु आम्ही हे करणार नाही. परवेजचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, नसल्याने रागिबला परीक्षण प्रक्रिया समजत नाही. त्यास जामीन मिळावा. त्यावर कोर्ट म्हणाले, आरोपपत्र दाखल झालेल्या सर्वांची सुटका करावी, असे तुम्हाला वाटते. रागिबच्या मानसिक स्थितीबाबत न्यूरोसायन्सेस, बंगळुरूच्या मंडळाने विरोधाभासी मत व्यक्त केले.

स्वत:च्या बचावासाठी दुसऱ्याला बळीचा बकरा
सिब्बल सर्वोच्च न्यायालयात म्हणाले, २०१९ मध्ये अटकेनंतर रागिबला ८ महिने कैदेत ठेवण्यात आले होते. आता आरोपपत्रानंतर त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्याला अर्थ नाही. रागिबने परदेशात पळून जाण्याचाही प्रयत्न केला व दुसऱ्याला बळीचा बकरा करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. घटनेनंतर रागिब दुबईला पळून गेला होता. परंतु दोन दिवसांनंतर कोलकाताला परतला. त्याला एका नर्सिंग होममधून ताब्यात घेण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.