यवतमाळात कोरोनाची घसरगुंडी सुरूच

- 354 मुक्त, 146 ग‘स्त, 4 मृत्यू

0 4

यवतमाळ,
मागील 24 तासांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण खूप जास्त आहेत. जिल्ह्यात 146 जण बाधित, तर 354 जण कोरोनामुक्त झाले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शनिवारी एकूण 5358 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यापैकी 146 जण नव्याने बधित, तर 5212 अहवाल कोरोनामुक्त आले. सध्या जिल्ह्यात 1829 रुग्ण उपचार घेत असून यापैकी 837 रुग्णालयात भरती, तर 992 गृहविलग आहेत.

आतापर्यंत एकूण बाधित रुग्णसंख्या 71,690 झाली आहे. 24 तासात 354 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेले एकूण रुग्ण 68,104 झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 1757 मृत्युंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 14 हजार 29 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 39 हजार 797 कोरोनामुक्त आहेत. सध्या जिल्ह्याचा बाधित दर 11.68, दैनंदिन बाधित दर 2.72, तर मृत्युदर 2.45 आहे. नव्या बाधित 146 जणांमध्ये 95 पुरुष आणि 51 महिला आहेत. यात पांढरकवडा 10, पुसद 11, वणी 27, यवतमाळ 42 प्रमुख आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोनाग‘स्तांसाठी सरकारी व खाजगी रुग्णालयात एकूण 1832 खाटा उपलब्ध आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.