शंकरपूर येथेच होणार कोरोना रुग्णांवर ऑक्सिजनसह, व्हेंटिलेटरवर उपचार !

- शंकरपूर ग्रामपंचायत बनली कोरोना युद्धात नागरिकांसाठी ढाल -राज्यातील पहिलाच उपक्रम, -युवा सरपंच ठरणार कोविड रुग्णासाठी देवदूत

0 140

शंकरपूर :
राज्यात कोरोना महामारीने हाहाकार मजला आहे त्यात चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुका हॅट स्पॉट ठरत आहे त्यामुळे चिमूर, भिसी,शंकरपूर येथे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे तर त्याच प्रमानात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर न मिळाल्याने रुग्णाचे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे यामुळे तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे तेव्हा या रूग्णांना ऑक्सिजन अभावी प्राण गमवावे लागणार नाही यासाठी शंकरपूर ग्रामपंचायत चे युवा होतकरू सरपंच साईश सतिष वारजूकर यांच्या संकल्पनेतून व शंकरपूर ग्रामपंचायतच्या पुढाकाराने आता गावातच कोरोना रूग्णांवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात येणार आहेत त्यामुळे गावातील नागरिकांची भीती दूर होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे मुस्किल होत असून आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे तर अनेक रुग्ण उपचाराआभावी रुग्णालया बाहेरच ऑक्सिजन अभावी प्राण सोडत आहेत अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे कोरोना नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या भीतीनेच अनेक रुग्णांचा ईमुनिटी पावर कमी होऊन मृत्यू होत आहे.

राज्यातील, जिल्ह्यातील ही कोरोना रुग्णाची स्थिती बघता चिमूर तालुक्यातील मॉडेल ग्रामपंचायत असलेल्या शंकरपूर ग्रामपंचायतचे युवा सरपंच साईश सतीश वारजूकर यांच्या संकल्पनेतून व ग्रामपंचायतच्या पुढाकाराने शंकरपूर येथे कोविड केयर सेंटर उभारण्यात येणार आहे या कोविड सेंटर मध्ये रुग्णांना ऑक्सिजन सह व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात येणार आहेत यामुळे शंकरपूर ग्रामपंचायत ही कोरोना युद्धात नागरिकांसाठी ढाल बनणार असून युवा सरपंच साईश यांच्या संकल्पनेतून साकारणारा हा राज्यातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे त्यामुळे युवा सरपंच कोरोना रुग्णाअसाठी देवदूत ठरणार आहेत.

या असणार सुविधा

चिमूर तालुक्यातील गावाचे अंतर हे चंद्रपूर, नागपूर शहरापासून शंभर किमी अंतरावर आहे त्यामुळे शंकरपूर येथेच कोविड चा उपचार व्हावा याकरिता या केंद्रात ऑक्सिजन कंसेंटरेटर, दुअल फ्लो 3 नग,हुमीडिफायर हे साहित्य राहणार आहेत, या केंद्रात सहा रुग्णांना पुरेल एवढा ऑक्सिजन, सोबत व्हेंटिलेटर चे बेड या केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत हे साहित्य खरेदी करण्याचे आदेश ग्रामपंचायत ने संमधीत एजन्सी ला दिले असून हे सर्व साहित्य आठ ते दहा दिवसांत येणार आहे.

ग्रामपंचायतची आधुनिक सोयीयुक्त रुग्णवाहिका
शंकरपूर हे गाव चंद्रपूर, नागपूर पासून शंभर ते सवासे किमी अंतरावर आहे त्यामुळे या शहरातील रुग्णालयात उपचारासाठी जाण्यासाठी दोन ते तीन तास लागतो त्यामुळे गरीब व आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या गंभीर रुग्णांना विशेष उपचारासाठी जाता यावे यासाठी शंकरपूर ग्रामपंचायत ने जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा निधीतून सर्व सोयी युक्त एमबुलन्स खरेदी केली असून ही एमबुलन्स रुग्णाच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी पुरवणार आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत मार्फत सर्व सोयी सुविधा असलेले कोविड केयर सेंटर सुरू करण्यात येणार आहे यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त असलेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी इथे सेवा देणार आहेत.

तालुक्यातील कोरोना ची स्थिती भयानक झाली आहे ऑक्सिजन, व व्हेंटिलेटर व बेड अभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला तर अनेक रुग्ण भीतीने ईमुनिटी कमी होऊन दगावत आहेत ही भीती दूर व्हावी व गावातील रुग्णांना गावातच उपचार व्हावे म्हणून पंधराव्या वित्त आयोग ,जिल्हा परिषद, यांच्या सहकार्याने हे केंद्र रुग्णाच्या सेवेत उभारण्यात आले.

साईश सतिष वारजूकर
सरपंच, ग्रामपंचायत शंकरपूर

Leave A Reply

Your email address will not be published.