होळी सणावर कोरोनाची सावट

0

शंकरपूर :
कोरोणाचा वाढता प्रभाव पाहता होळीचा सणावर मर्यादा आली असून ग्रामीण भागात होळी सणात पारंपरिक धार्मिक, रूढी अजूनही जोपासल्या जात असल्याने हा सण लहान मुलांपासून ते मोठ्या नागरिकापर्यंत हवाहवासा वाटतो.

ग्रामीण भागात हा सण पाच दिवसाचा तर काही भागांमध्ये आठवड्यात साजरा करण्यात येते होळी सणानिमित्त काही गावांमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमाची हलचल राहते या वर्षी होळीच्या सणाला तोंडावर कोरोणाच्या प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे सरकारकडून मर्यादा लावण्यात आल्या असून साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे परिणामी रंगांची उधळण करणाऱ्या होळीच्या सणातील यावेळी रंग फिके पडणार असून हा सण साजरा करणाऱ्या अनेक उत्साही मंडळीत नाराजी दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.