Coronavirus India : करोनाने टेन्शन वाढवलं, देशात आढळले ७२ हजारांवर नवीन रुग्ण

देशात करोनाचा संसर्ग आता वेगाने होत आहे. यामुळे सरकार आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. आता गेल्या २४ तासांत ७२ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आल्याची माहिती सरकारने दिली आहे. महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये करोनाचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

0

नवी दिल्लीः करोना संसर्गाची दुसरी लाट अतिशय धोकादायक ( coronavirus india ) असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गुरुवारी करोना रुग्णांच्या संख्येत ३५ टक्के इतकी मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. देशात गेल्या २४ तासांत ७२,३३० नवीन रुग्णांची नोंद ( new covid19 cases ) झाली आहे. या वर्षांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. करोनाने गेल्या २४ तासांत देशात ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेत अधिक आहे. यानुसार करोनाच्या देशातील मृतांची एकूण संख्या ही १,६२,९७२ इतकी झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्या घटली आहे. यामुळे करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केही घसरून ती ९३.८९ इतकी झाली आहे. करोनातून बरे हो गेल्या २४ तासांत ४०,३८२ जण करोनातून मुक्त झाले आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने आकडेवारी जारी केली आहे. देशात सध्या ५ लाख ८४ हजार ५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जे एकूण रुग्णसंख्येत ४.७८ टक्के आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हा आकडा २ लाखांच्या खाली गेला होता. मृत्यूदर ही वाढला असून तो १.३३ टक्क्यांवर गेला आहे.

८ राज्यांत सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेश या ८ राज्यांमध्ये करोना रुग्णांची मोठी वाढ दिसून येत आहे. या ८ राज्यांमधून रोज ८४.६१ टक्के नवीन रुग्ण आढळून येत असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

coronavirus india : AIIMS चे संचालक म्हणाले, ‘भारतात सध्या ब्रिटनसारखी स्थिती’

४५ वर्षांवरील सर्वांना आजपासून करोनावरील लस

देशात आजपासून ४५ वर्षांवरील सर्वांना करोनावरील लस देण्यात येत आहे. सरकारी किंवा खासगी हॉस्पिटल्समध्ये ही लस घेता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.