नाशिक शहरातील ३९ मृतांसह जिल्‍ह्यात कोरोनाचे ५७ बळी

0 4

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोना बळींची संख्या चिंताजनकरित्‍या वाढते आहे. मंगळवारी (ता.८) नाशिक महापालिका क्षेत्रातील ३९ मृतांसह जिल्‍ह्‍यात ५७ बाधितांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. ३५६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तर साडे सातशे रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत ४५१ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात पाच हजार २६१ बाधितांवर उपचार सुरु आहे. (corona updates 57 corona positive patients died in nashik district)

मंगळवारी शहरातील मृतांची संख्या तब्‍बल ३९ राहिली. यात पंचवटी परीसरातील सर्वाधिक दहा मृतांचा समावेश आहे. याशिवाय सातपूरचे पाच, नाशिकरोडचे चार, मुंबईनाका परीसरातील दोन, गंगापूर रोड व इंदिरानगर परीसरातील प्रत्‍येकी दोन मृतांचा समावेश आहे. पाथर्डी फाटा व पाथर्डी गाव येथील प्रत्‍येकी एका बाधिताचा मृत्‍यू झाला. जुने नाशिक, द्वारका येथील प्रत्‍येकी एक बाधिताचा मृत्‍यू झाला आहे. नाशिक ग्रामीणमधील अठरा बाधितांचा कोरोनाने बळी घेतला.

शहरात १२३ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले असून, नाशिक ग्रामीणमध्ये २०७, मालेगावला पंधरा तर जिल्‍हा बाहेरील अकरा पॉझिटिव्‍ह आढळले. दुसरीकडे नाशिक शहरातील ३३८ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. नाशिक ग्रामीणमध्ये ३७६ तर मालेगावला बारा, जिल्‍हा बाहेरील चोवीस रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत एक हजार ५२८ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील ८४८, नाशिक शहरातील ३६८, मालेगावच्‍या ३१२ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७३४ रुग्‍ण आढळले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ६७० रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात चार, डॉ.पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील ३३, मालेगावच्‍या पंचवीस रुग्‍णांचा समावेश आहे.

(corona updates 57 corona positive patients died in nashik district)

Leave A Reply

Your email address will not be published.