प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव येथे कोरोना लसीकरण संपन्न

0 28

ग्रामस्त व शिक्षकांना करून घेतले कोरोना प्रतिबंधक लसीकरण

भोनगाव :
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यू संख्या लक्षात घेता कोराना लस ही पुर्णपणे सुरक्षित असुन ही लस आरोग्य कवच आहे त्यामुळे शिक्षकांसह ग्रामस्थ कोरोना लसीकरण करून घेत आहेत.९ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुनिल घावट,सचिन वडाळ, प्रफुल्ल भोंडे उर्मिलाताई वडाळ या शिक्षकासह १०६ लाभार्थ्यानी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.डी.पी.कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरणाचा लाभ घेतला. या लसीकरण कॅम्पकरिता डाॅ.एल.डब्ल्यू राठोड व सर्व आरोग्य सेवक आर.पी.निखाडे,एस.आर.भोंबळे,टि.जी.भोंडे,मो.शहिद,अंजली सोनार,श्रीमती शिवदे,ए.व्हि.सरनाईक
यांनी कोरोना लसीकरण कॅम्प यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

कोराना लसीकरण नोंदणी करतांना ग्रामस्थ व शिक्षक यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राती कर्मचारी

 

 

लसीकरणाचा लाभ घेतांना जिल्हा परिषद शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट

Leave A Reply

Your email address will not be published.