कुंभमेळ्यात कोरोनाचे थैमान! तब्बल ‘इतक्या’ लोकांचे रिपोर्ट आले कोरोना पॉझिटिव्ह

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळी आहे. दररोजचा कोरोनाचा वाढत आकडा सर्वांच्याच चिंतेत वाढ करत आहे. अशातच कोरोनवर लवकर औषध उपचार न भेटल्याने दररोज कित्येक रुग्णाचे मृत्यू होत आहे. मात्र अशातच आता चिंतेत आणखी भर टाकणारी बातमी समोर आली आहे.

हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळाव्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. हरिद्वार कुंभमेळ्यातील अनेकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हरिद्वारमध्ये आतापर्यंत ३० साधूंचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत तीन शाहीस्नान झाले असून त्यासाठी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे सध्या वैद्यकीय टीम आखाड्यात दाखल झाल्या असून सलग सर्व साधूंची RT-PCR चाचणी केली जात आहे.

दरम्यान, हरिद्वार कुंभमेळ्यात उसळलेली भाविकांची गर्दी व त्यातून कोरोनाच्या संसर्गाला मिळणारे निमंत्रण पाहता निरंजनी आखाड्याने कुंभ समाप्तीची घोषणा केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.