IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी येऊ देणार की नाही?, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं स्पष्टीकरण

आयपीएल स्थगित झाल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात एन्ट्री दिली जाणार की नाही?, ते मायदेशी रवाना होऊ शकणार की नाही? याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

0 3

मुंबई : कोरोनामुळे (Corona) आणि खेळाडूंना बाधा झाल्याने बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. आयपीएलचा 14 वा हंगाम स्थगित झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू भारतात अडकून पडले आहेत. त्यातल्या त्यात ऑस्ट्रेलियन सरकारने तर अतिशय कडक निर्बंध लागू केले आहेत. अशावेळी आयपीएल स्थगित झाल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशात एन्ट्री दिली जाणार की नाही?, ते मायदेशी रवाना होऊ शकणार की नाही? याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. (Cricket Australia big Statement Ausralian Player returns Over IPL 2021 Suspended)

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय स्पष्टीकरण दिलंय…?

“ऑस्ट्रेलियन सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया पावलं उचलेल. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या विमानांना प्रतिबंध घातला आहे. खेळाडूंसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्यातून सूट मागणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या साथीने आयपीएल स्थगितीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी कसं आणता येईल, यासंबंधी विचार करेल आणि आवश्यक तशी पावलं उचलेल”, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.

आयपीएलचा बायो-बबल छेदत कोविड संसर्गाच्या अनेक घटना घडल्यानंतर आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) संयुक्त निवेदनात म्हटलंय की, “ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री करुन योग्य प्लॅन आखला जाईल आणि त्यांच्या मायदेशी परतण्याविषयी निर्णय घेतला जाईल”

“क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) ऑस्ट्रेलियन सरकारने घालून दिलेल्या नियमांचा आदर करते. आम्ही खेळाडूंसाठी सरकाकडून कोणतीही सूट मागणार नाही. बीसीसीआयच्या आम्ही संपर्कात आहोत. त्यांच्या साथीने आम्ही लवकरच ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मायदेशी परतण्याविषयी प्लॅन बनवू”, असं क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) संयुक्त निवेदनात म्हटलंय.

ऑस्ट्रेलियाचे कोणकोणते खेळाडू भारतात अडकलेत…?

पॅट कमिन्स आणि बेन कटिंग
ग्लेन मॅक्सवेल आणि डॅनियल सॅम्स
नॅथन कुल्टर नाईल आणि ख्रिस लिन
जेसन बेहरनडॉर्फ आणि डेव्हिड वॉर्नर

Leave A Reply

Your email address will not be published.