IPL 2021: 11 बॅट्समनसह पहिल्या मॅचमध्ये उतरणार धोनी, पाहा चेन्नईची संभाव्य Playing 11

महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) या स्पर्धेतील पहिली मॅच शनिवारी दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होणार आहे.

0 0

मुंबई, 10 एप्रिल : महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) या स्पर्धेतील पहिली मॅच शनिवारी दिल्ली कॅपिटल्सशी (Delhi Capitals) होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत (Rishabh Pant) असल्यानं ही लढत आणखी खास आहे. पंतला धोनीचा उत्तराधिकारी मानलं जातं. त्यानं यावर्षी स्वत:ला सिद्धही केलं आहे. आता पहिल्यांदाच पंत कॅप्टन म्हणून त्याच्या आयडॉल विरुद्ध खेळणार आहे.

धोनीच्या टीमसाठी मागील सिझन (IPL 2020) निराशाजनक ठरला होता. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करण्यात अपयश आले होते. या सिझनमध्ये चेन्नईनं काही उपयुक्त खेळाडूंचा टीममध्ये समावेश केला आहे. त्यामुळे चेन्नईच्या फॅन्सना या सिझनमध्ये टीमकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

या आयपीएलमधील (IPL 2021) पहिल्या मॅचमध्ये धोनीची टीम नव्या डावपेचासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्या टीममध्ये यंदा सुरेश रैनाचं पुनरागमन झालं आहे. त्याचबरोबर कृष्णप्पा गौतम आणि मोईन अली हे दोन ऑल राऊंडरही चेन्नईकडं आहेत.

चेन्नई सुपर किंग्सनं मागच्या सिझनमध्ये सॅम करनला ओपनर म्हणून संधी दिली होती. ऋतुराज गायकवाडनं देखील चेन्नईच्या इनिंगची सुरुवात केली होती. यावेळी धोनी फाफ ड्यू प्लेसीसोबत मोईन अलीला ओपनिंगला संधी देण्याची संधी आहे. डाव्या हाताचा मोईन सहसा सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर बॅटींग करतो. पण त्यानं इंग्लिश कौंटीमध्ये टॉप ऑर्डरमध्ये बॅटींग केली आहे. चेन्नईनं मोईनला संधी दिली तर लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनसह त्यांच्या इनिंगची सुरुवात होऊ शकते.

सुरेश रैना आणि अंबाती रायडूवर मिडल ऑर्डरची जबाबदारी असेल. कॅप्टन धोनी पाचव्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर जडेजा आणि सॅम करनचा नंबर असेल. तर शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करण्यासाठी चेन्नईकडं ड्वेन ब्राव्हो आणि कृष्णप्पा गौतम हे खेळाडू आहेत. दीपक चहर आणि शार्दुल ठाकूरवर बॉलिंगची जबाबदारी असेल. हे दोघेही गरज पडली तर बॅटींग करु शकतात. त्यामुळे धोनीची टीमकडं पहिल्या मॅचमध्ये 11 व्या क्रमांकापर्यंत चांगले बॅट्समन असतील अशी शक्यता आहे.

चेन्नई सुपर किंग्सची संभाव्य Playing 11 : फाफ ड्यू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबती रायडू, महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेट किपर), रवींद्र जडेजा, सॅम करन, कृष्णाप्पा गौतम, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर

Leave A Reply

Your email address will not be published.