IPL 2021: जॉनी बेअरस्टोच्या सिक्सनं फुटलं फ्रिज! SRH चे खेळाडू थोडक्यात बचावले, VIDEO

जॉनी बेअरस्टोनं (Jonny Bairstow) 22 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्सच्या लगावले. बेअरस्टोच्या आक्रमक फटकेबाजीमुळे हैदराबादचे खेळाडू जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले.

0 5

चेन्नई : डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सनं 13 रननी पराभव केला. मुंबईनं हैदराबादसमोर विजयासाठी 151 रनचं लक्ष्य दिलं होतं. पण, हैदराबादची टीम 137 रनवर आटोपली. हैदराबादचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे.

हैदराबादची या मॅचमध्ये सुरुवात चांगली झाली होती. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांनी भक्कम सुरुवात केली. या स्पर्धेत पहिल्यांदाच ओपनिंगला एकत्र खेळत असलेल्या या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 67 रनची पार्टरनरशिप केली. या दोघांमध्ये बेअरस्टो विशेष आक्रमक होता. त्यानं ‘पॉवर प्ले’ मध्ये मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली.

जॉनी बेअरस्टोनं 22 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्सच्या लगावले. बेअरस्टोच्या आक्रमक फटकेबाजीमुळे हैदराबादचे खेळाडू जखमी होण्यापासून थोडक्यात बचावले. हैदराबादच्या इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बेअरस्टोनं ट्रेंट बोल्टच्या बॉलवर इतक्या जोरात सिक्स मारला की तो डगआऊटमध्ये ठेवलेल्या फ्रिजला धडकला. यामुळे फ्रिचच्या काचेचा चुरा झाला. या फ्रिजच्या जवळ हैदराबादचे खेळाडू बसले होते. सुदैवानं यापैकी कुणालाही तो बॉल लागला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. या खतरनाक शॉटपूर्वी बेअरस्टोनं बोल्टच्या ओव्हरमध्ये दोन फोर देखील लगावले होते.

जॉनी बेअरस्टो 43 रनवर हिटविकेट झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याच्या अचूक थ्रो मुळे डेव्हिड वॉर्नर 36 रन काढून रन आऊट झाला. बेअरस्टो-वॉर्नर जोडी आऊट झाल्यानंतर हैदराबादच्या अन्य बॅट्समननं निराशा केली. विजय शंकरनं 28 रन काढत थोडा प्रतिकार केला, पण त्याचा प्रतिकारही कमी पडला.

या विजयाबरोबरच मुंबईची टीम पॉईंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे. तर विराट कोहलीची (Virat Kohli) आरसीबी (RCB) दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. हैदराबादला अजून एकही विजय मिळालेला नसून ती टीम सर्वात तळाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.