‘टेस्ट क्रिकेटमध्ये पहिला बॉल खेळणार नाही’, टीम इंडियाच्या खेळाडूनं केलं जाहीर

विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया 18 ते 22 जूनच्या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) खेळणार आहे.

0 16

मुंबई, 14 जून:  विराट कोहलीच्या (Virat Kohli) कॅप्टनसीमध्ये टीम इंडिया 18 ते 22 जूनच्या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल (WTC Final 2021) खेळणार आहे. साऊथम्पटनमध्ये होणाऱ्या या लढतीत सर्वांचं लक्ष युवा बॅट्समन शुभनन गिलवर (Shubman Gill) असेल. गिलनं त्याच्या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये अनेकांना प्रभावित केले आहे. ऐतिहासिक टेस्ट फायनलमध्ये खेळण्याची संधी त्याला मिळेल, असा क्रिकेट तज्ज्ञांचा अंदाज आहे.

साऊथम्पटनचं पिच हे स्विंग बॉलिंगला मदत करणारे असल्यानं गिलची तिथं कसोटी लागणार आहे. न्यूझीलंडचे फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि टीम साऊदी (Tim Southee) यांचा सामना गिलला करावा लागणार आहे.  तो या बॉलर्सना कशा पद्धतीनं खेळेल यावर टीम इंडियाची सुरुवात अवलंबून असेल.

‘पहिला बॉल खेळणार नाही’

गिलनं त्याच्या टेस्ट कारकिर्दीमध्ये फक्त एकदा पहिल्या बॉलचा सामना केला आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या अहमदाबाद टेस्टमध्ये पहिला बॉल खेळला होता. त्यावेळी जेम्स अँडरसननं त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये इनस्विंगरवर LBW केले होते. गिलला त्या इनिंगमध्ये खातही उघडता आले नाही.

21 वर्षांच्या तरुण बॅट्समनला आजही तो प्रसंग आठवतोय. ‘द ग्रेड क्रिकेटर शो’ मध्ये त्याने त्याबद्दल सांगितलं आहे. त्या इनिंगच्या सुरुवातीला मी स्वत: रोहित शर्माला पहिला बॉल खेळतो, असं सांगितलं होतं. ते मी का केलं हे माहिती नाही. पण त्यावेळी मी तिसऱ्या की चौथ्या बॉलवर शुन्यावर आऊट झालो. त्यामुळे आता पुन्हा असं होणार नाही.” असं गिलनं जाहीर केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.