WTC Final आधी न्यूझीलंडला धक्का! दुखापतीमुळे विल्यमसन आऊट ‘हा’ खेळाडू कॅप्टन

0 2

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनच्या (Kane Williamson) डाव्या कोपराला दुखापत झाली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे.

 

लंडन, 10 जून: न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसनच्या (Kane Williamson) डाव्या कोपराला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमधून आऊट झाला आहे. विल्यमसन भारताविरुद्ध होणारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याची (WTC Final 2021) शक्यता कमी आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या तयारीला मोठा धक्का बसला आहे. विल्यमसनच्या ऐवजी टॉम लॅथम (Tom Latham) टीमचं नेतृत्त्व सांभाळणार आहे. तर अंतिम 11 मध्ये विल यंग हा विल्यमसनची जागा घेणार आहे.

न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “विल्यमसनबाबत निर्णय घेणे सोपे नव्हते. पण हा योग्य निर्णय होता. 18 जून रोजी होणाऱ्या फायनलपर्यंत तो फिट होईल अशी आम्हाला आशा आहे.’ तर विल्यमसन फायनलपर्यंत फिट होण्याची शक्यता कमी असल्याचं वृत्त ‘स्पोर्ट्स तक’ने दिले आहे.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये विल्यमसन अपयशी ठरला होता. त्यामुळे फायनलपूर्वी त्याच्यासाठी सरावाची शेवटची संधी होती. आता दुखापतीमुळे तो दुसऱ्या टेस्टमधून आऊट झाल्याने विल्यमसन अडचणीत आला आहे.

फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) दुसऱ्या टेस्टसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे टीम साऊदी, नील वेग्नर आणि काईल जेमीसन यांच्यापैकी एकाला विश्रांती देण्यात येणार आहे. न्यूझीलंडचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. फायनल मॅचसाठी आमचे प्रमुख बॉलर ताजे राहावे आणि त्यांनी भारताविरुद्ध पहिल्या बॉलपासून चांगले प्रदर्शन करावे यासाठी आम्हाला खबरदारी घ्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.

“आम्ही 20 खेळाडूंसह इथे आलो आहोत. आमच्या टीममधील अनेकांना टेस्ट क्रिकेटचा अनुभव आहे. मॅट हेन्री, डॅरिल मिचेल, डग ब्रेसवेल, एजाज पटेल यासारखे खेळाडू यापूर्वी टेस्ट खेळले आहेत.” याची आठवण त्यांनी करुन दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.