बनावट करोना अहवाल तयार करणाऱ्यांविरुद्ध पंढरपुरात गुन्हा

गुह्यात अजून किती जण आहेत, याची चौकशी चालू आहे.

0 0

पंढरपूर : बनावट करोना तपासणी अहवाल तयार करणाऱ्या येथील एका ‘पॅथॉलॉजी लॅब’वर करण्यात आली. ‘वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब’ असे या प्रयोगशाळेचे नाव असून या प्रकरणी आकाश गोरख आदमिले आणि उमेश शिंगटे या दोघांविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविड तालुका कृति समिती मार्फत पंढरपूर शहरातील अनधिकृत करोना चाचणी करून बनावट अहवाल वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब देत होती. याची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, नायब तहसीलदार पंडित कोळी, पोलीस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने छापा टाकला. या वेळी वात्सल्य लॅब चालक आकाश आदमिले यास अवैध अहवाल तयार करताना आणि ‘रॅपिड अँटिजेन  टेस्ट किट’ सहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याला ‘किट’ पुरवणारा तसेच बनावट अहवाल तयार करून देणारा उमेश शिंगटे यालाही पकडले आहे.

आदमिले व उमेश शिंगटे या दोघांनी हे काम गेल्या २ ते ३ महिन्यांपासून करत असल्याची कबुली दिली. याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्यात अजून किती जण आहेत, याची चौकशी चालू आहे.

डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅबचालकानी दक्षता घ्यावी

अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत करोना चाचणी आपल्या रुग्णालय अथवा लॅब मध्ये केली जात नाही. याची पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर आणि पॅथॉलॉजी लॅब चालकानी दक्षता घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम यानी केले आहे. जर असे काही आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन  कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.