पवार, ठाकरेंचे मॉर्फ फोटो पोस्ट केल्याप्रकरणी ‘फडणवीस फॅन क्लब’, ‘कोमट बॉइज & गर्ल्स’ ग्रुपविरोधात गुन्हा दाखल

0 73

देशातील महान राष्ट्रपुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्यांनी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. पुणे शहरातील शिवसेना उपशहरप्रमुख किरळ साळी यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून अश्लील शब्द वापरुन बदनामी करणाऱ्यांविरोधात पुण्यातील साबर पोलीसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील युवासेना उपाध्यक्ष आकाश शिंदे यांनी या प्रकरणामध्ये तक्रार नोंदवली आहे.

दिनांक ४ मे आणि त्यापूर्वीही राजकारण महाराष्ट्राचे नावाच्या फेसबुक, इंटलेक्युअल फोरम या व्हॉट्सअप ग्रुपवर, कोमट बॉइज अ‍ॅण्ड गर्ल्स फेसबुक ग्रुप आणि सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब या फेसबुक पेज आणि ट्विटरसारख्या सामाजमाध्यमांवर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यासारख्या घटनात्मक पदावर असणाऱ्या राजकीय व्यक्तींच्या प्रतिष्ठेला बाधा निर्माण करणारे आणि त्यांचं चारित्र्य हणन होईल अशापद्धतीचे फोटो पोस्ट करण्यात आल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं आहे. मॉर्फ केलेले फोटो, अश्लील भाषेतला मजकूर वापरुन जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूने पोस्ट करण्यात आले होते. त्याचप्रमाणे स्वरुप भोसले नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर राष्ट्रपुरुषांच्या नावाने बदनामीकारक मजकूर पोस्ट करुन सामाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

या तक्रारीची दखल घेत नाना पंडीत, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील, शौर्यन चोरगे, अतुल आयचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव, स्वरुप भोसले आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीसचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.