Corona Test | विठ्ठल मंदिरात भाविकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय रद्द

विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांची रॅपिड टेस्ट करूनच मंदिरात सोडण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला होता. यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाकडून चाचण्या केल्या जाणार होत्या.

0

पंढरपूर : वाढत्या कोरोना संसर्गामळे विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय बारगळला असून हे वादग्रस्त ठरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने माघार घेतली आहे. देशातील कोणत्याही मंदिरात अशी चाचणी घेतली जात नसल्याने प्रशासनाने आता या भूमिकेपासून यु टर्न घेतला आहे. यातच मग विठ्ठल मंदिरात कोरोना चाचणी सुरू केली तर सर्वच धर्मियांच्या प्रार्थना स्थळात अशी चाचणी का नको? अशी भूमिका पुढे आल्याने प्रशासनाने हा निर्णय रद्द केला आहे.

विठ्ठल मंदिरात येणाऱ्या भाविकांची रॅपिड टेस्ट करूनच मंदिरात सोडण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतला होता. यासाठी नगरपालिका व आरोग्य विभागाकडून चाचण्या केल्या जाणार होत्या. यासाठी दर्शन मंडपातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी करून भाविकांना मंदिरात सोडण्यात येणार होते. उद्यापासून या तपासण्या सुरू करण्याची प्रशासनाची तयारी असतानाच याबाबत वाद सुरू झाल्याने हा निर्णय तातडीने रद्द करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.