ग्रा.प.सदस्या व्यातिरिक्त गावातील आठवा कॉल नको असलेल्या सचिवाची गावकर्यांकडून बदलीची मागणी

चिमूर पं.समितीतील बदमाश ग्रा.प.अशी गावाची सचिवाकडून बदनामी, गाव हिताच्या निर्णयाकडे सचिवाचे दुर्लक्ष चिमूर पतीनिधी : -

0 78

चिमूर पं.स. तील पुयारदड ग्रा.प. मधे कार्यरत सचिव प्रतिभा कन्हाके यांच्या असभ्य ,उद्धट बोलने व सरपंच व ग्राम सदस्या सोबतच्या अशोभनीय वागणूकीची नागरीकांना चाहूल लागताच संतापलेल्या नागरीकांकडून १७ जून रोजी गट विकास आधिकारी मार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर याना ग्राम सचिवाच्या बदलीच्या मागणी सदर्भातील निवेदन बिडीओ कार्यलय चिमूर येथे सादर करण्यात आले .

सविस्तर वृत असे की, पुयारदंड ग्रा.प. येथे दोन वर्षपासून रिक्त असलेल्या शिपाई भरती संदर्भात १ मार्च २१ रोजी शासन परिपत्रकानुसार जाहीर नोटीस काढून शिपाई पदभरती साठी इच्छूक युवक व युवतीकडून अर्ज मागावेण्यात आले . त्यात नियम व अटीनुसार आलेल्या १२ अर्जाची साचेवा कडून छानणी न करता नियम व अटि याची पायमल्ली करूण सरसकट सर्व अर्जदारांना परिक्षेला बसविले .
परिक्षेच्या अगोदरच्या दिवशी आपण अर्जाची छानणी करूण घ्यायला हवी अशी बाब सरपंच बी .एस . पारधी व इतर सदस्य यांनी सचिवांना लक्षात आणून दिली परंतू सचिवांनी याकडे लक्ष न देता परिक्षा झाल्यावरही आपल्याला अर्जाची छाननी करता येते असे उत्तर सचिवाकडून सरपंच व इतर सदस्याना मिळाले .

त्यानंतर २५ मार्चला लेखी परिक्षा घेण्यात आली .
नियम व अटिनुसार छाननी न केल्यामुळे ४२ वर्षाच्या अर्जदारानेही परिक्षा दिली . ही बाब गावकर्यांना माहीत होताच शिपाई पदभरती च्या विरोधात गावकर्याकडून आक्षेप अर्ज सादर झाले .

३१ मार्चला परिक्षेचा निकाल काढला.१२ एप्रील रोजी उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्याला साचेव यानी स्वमर्जीने स्वतःच्या सहीनिशी नियुक्ती पत्र पाठविले . तेव्हा सरपंच व सदस्य यांनी आलेल्या आक्षेप अर्जाचा तोडगा लागेपर्यत आपण नियुक्ती पत्र कोणालाही देवू शकत नाही असे मत व्यक्त केले .यावरूण सचिवांनी सरपंच पारधी यांची लाज काढली व इतर सदस्यांना अपमानास्पद बोलून पुयारदंड ग्रा.प. चिमूर पंचायत समितीतील बदमास ग्रामपंचायत अशी गावाची बदनामी केली .कारोना महामारीच्या संकटात गावाच्या निरजंतूकीकरणाकडे व जनजागृती कडे लक्ष न देता साचेवाने सरपंच व इतर सदस्य यांना स्वतःच्या पगाराची धमकी दाखवत , झगड्याचे वातावरण निर्माण केले .

या संदर्भात १२ एप्रील ला ग्रामसचिव कन्हाके याच्या विरोधात तक्रार दाखल केली त्या तक्रारीची दखल घेत २७ मे रोजी विस्तार अधिकारी सोरदे याचेकडून चौकशी लावण्यात आली . परंतू दोन महीने लोटूनही गेले तरी सचिव प्रतिभा कन्हाके यांच्या विरोधात कोणतीही कारवाई दिसून आली नाही .

पुयारदड ग्रा.प. चिमूर प.समिती मधील बदमास ग्रामपंचायत आहे असे आमच्या गावाबद्दल अपमानास्पद बोलनाऱ्या , गावाचे प्रथम नागरीक सरपंच याची लाज काढणाऱ्या , उपसरपंच व इतर सदस्य यांना असभ्य व उद्धट वागणूक देणाऱ्या , गावाच्या विकासाकडे लक्ष न देता स्वतःच्या मनमर्जीने कारभार करणाऱ्या साचेवाची आम्हाला गरज नाही . अश्या साचेवाचा आमच्या ग्रा .प. यतीचा पदभार लवकारात लवकर काढून टाकूण ताबोडतोब बदली करावी अशी मागणी गा.प.पदाधिकारी , सदस्य व गावातील नागारेकाकडून होत आहे .

ग्रामसचिव प्रतिभा कन्हाके यांना ग्रा.प. मधील ७ सदस्याच्या व्यतिरिक गावातून कोणत्याही नागरीकांचा फोन नको .मला त्याच्याशी काहीही मतलब नाही अशा प्रकारचे ग्रावसेवकाचे बोल अशोभनीय आहे. यामुळे गावात नागारेकांमधे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे .यामुळे समोर घडून येणाऱ्या परिणामास साचेव स्वतः जबाबदार राहील असा इशारा नागरीकांकडून दिला जात आहे .
: – पुयारदंड येथील समस्त सही करणारे नागरीक

Leave A Reply

Your email address will not be published.