8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करा ,अन्यथा उपोषणाचा इशारा. उध्दव नागरे
मागील वर्षी चा सन 2021 च्या खरीप हंगामातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या अंजनी खुर्द महसूल मंडळ मधील खळेगाव, महारचिकना, खापरखेड सोमठाणा, कारेगाव ,कोयाळी ,वडगाव तेजन, उदनापूर, वालूर व अंजनी खुर्द या गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामधील गावा मधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे सोयाबीन, तूर ,मूग, उडीद, कपास या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
शासनाने शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट मदत जाहीर केली होती ,इतर महसूल मंडळ मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत सुद्धा मिळाली आहे पण अंजनी खूप महसूल मंडळ मध्ये एक वर्ष होऊन सुद्धा अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसात शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी. अन्यथा तहसील कार्यालय लोणार समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा उद्धव नागरे , संतोष घुले व गजानन ढाकणे यांनी आज तहसिलदार साहेब यांना निवेदन द्वारे दिला आहे