फडणवीसांच्या २५ वर्षीय पुतण्याने लस कशी घेतली?; ट्यूब पेटताच इंस्टावरुन हटवला फोटो

राज्यात कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या महाआघाडी सरकारला विधानसभेचे नेते देंवेंद्र फडणवीस नेहमी धारेवर धरत असतात.

0 30

नागपूर :  राज्यात कोरोना (Corona) संकटामुळे अडचणीत असलेल्या महाआघाडी सरकारला विधानसभेचे नेते देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नेहमी धारेवर धरत असतात. सरकारच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून फडणवीस टीका करण्याची संधी सोडत नाहीत. मात्र पुतण्यामुळे फडणवीसांवर आता काँग्रेस जोरदार हल्लाबोल करत आहे. या टीकेसाठी जबाबदार ठरलाय तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis)यांचा इंस्टाग्रामवरील फोटो.

राज्यात एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरू आहे. त्यातच विधान सभेतील  विरोधी  पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी कोरोनाची  लस घेतल्याचा फोटो  व्हायरल झाला आहे. त्यांचे वय ४५ वरती नसतानाही त्याला लस कशी काय मिळाली?असा प्रश्न  उपस्थित करण्यात आला आहे.

तन्मय फडणवीस माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू असून त्यांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे. नागपुरातील नॅशनल  कॅन्सर इन्स्टिट्यूट (National Cancer Institute) येथे त्यांनी लस घेतल्याचा  फोटो सोमवारी सोशल मीडियावर  व्हायरल झाला. रात्री इंस्टग्रामवरुन  नंतर तो फोटो हटविण्यात आला. मात्र तोपर्यंत अनेकांनी स्क्रीन शॉट्स घेऊन ठेवले होते.

यावरुन काँग्रेसने फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. ४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट असतानादेखील फडणवीसांच्या पुतण्यााला लस मिळाली. भाजप नेत्यांच्या कुटुंबियांचा जीव महत्त्वाचा, मग  इतर लोक काय किड्यामुंग्या आहेत का ? त्यांच्या जीवाची काही किंमत नाही का? असा सवाल महाराष्ट्र काँग्रस(Maharashtra Congress)ने ट्विटरवर उपस्थित केला.

दरम्यान याविषयी माध्यमांनी तन्मय फडणवीस याचे वडील अभिजित फडणवीस यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.