संकटामध्ये कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही, देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही

0 2

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
जळगाव : महाराष्ट्रातील दररोजची वाढती कोरोना रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. बेड, ऑक्सिजन तसेच वेळीच उपचार न मिळाल्याने महाराष्ट्रात हजारो कोरोना रुग्ण मृत्यू पावत आहेत. अशातच राजकाणातील आरोप-प्रत्यारोप थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले आहे.

एकनाथ खडसे जळगाव मध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आले जसे की किल्लारीचा भूकंप, मुंबईमध्ये झालेला २६/११ चा हल्ला किंवा रेल्वेमध्ये झालेले १६ बॉम्बस्फोट अशा अनेक प्रसंगाच्या वेळेस राजकारण बाजूला सोडून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी हातात हात घालून कामं केली. त्यावेळच्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. पण अशा संकटामध्ये कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही. असे यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार येत्या २ मे च्या दिवशी पडेल. असे भाकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केले होते. याच मुद्द्याला हात घालत, “मला वाटते देवेंद्र फडणवीस एक उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी चार ते पाच वेळा हे सरकार पडणार असल्याचे सांगितले आहे. आता तर त्यांनी २ तारीख दिली आहे आता २ तारखेपर्यंत वाट पाहतो, नाहीतर फडणवीसांचा भविष्यकाराचा अभ्यास कमी आहे असे मी समजत असल्याचे म्हणत एकनाथ खडसेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.