Devendra Fadnavis Letter to CM Uddhav Thackeray: राज्यातील कोविड-19 परिस्थितीवरुन देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पहा काय म्हणाले

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोविड-19 परिस्थितीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. पहा त्यात ते काय म्हणाले...

0 25

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या परिस्थितीवरुन  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (मंगळवार, 27 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी मुंबईसह राज्यात कमी झालेले चाचण्यांचे प्रमाण, संसर्गाचा वाढता धोका, मृतांच्या नोंदी अशा विविध मुद्द्यांना हात घातला आहे. हे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटवरुन शेअर केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात सर्वप्रथम कोरोना चाचण्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्या वर्षी पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या चाचण्या कमी होत आहेत. ही आकडेवारी यापूर्वी अनेकदा तुमच्या निर्दशनास आणून दिली आहे, असं म्हणत आकडेवारी जारी करत त्यांनी पुन्हा एकदा याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. तसंच नागपूर, पुण्याच्या तुलनेत मुंबईत चाचण्यांचे प्रमाण कमी असून त्यामुळे भविष्यात कोरोनाची स्थिती हाताळणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्यात जवळपास 40 टक्के चाचण्या अँटीजेन पद्धतीने होत असून आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुंबईतील नेमके चित्र समोर येणार नाही. तसंच मुंबईतील संसर्ग 14-18 टक्के असून राज्यातील संसर्ग 25-27 टक्के असल्याने चाचण्यांचे कमी प्रमाण परवडणारे नसल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्क्यांच्या वर हवे, असा केंद्र सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत असून देखील त्याचे पालन होताना दिसत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विट:

पुढे ते लिहितात,  मुंबईच्या बाबतीत अधिक सजगतेने काम करण्याची गरज आहे. मुंबईतून अनेक लोक गावी गेले असून पूर्वीप्रमाणे त्यांचे ट्रॅकिंग, ट्रेसिंग होत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातही संसर्ग वाढत आहे. मुंबईतील मृतांचा आकडा दडवण्यात येत आहे. अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची मृतसंख्या यांचा ताळमेळ बसत नाही. हीच परिस्थिती इतर जिल्ह्यांमध्येही आहे. यामुळे राज्यातील एकूण चित्र समोर येणार नाही. मुंबईसह राज्यातील कोणत्याच भागात दुर्लक्ष करणे परवडणारे नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ द्यायचे नसले तरी कोरोना कमी होतोय, असं आभासी चित्रही तयार होणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.