धोनीचा षटकारच नव्हे बॅटही ठरली खास, गिनीज बुकात नोंद

0 20

सध्या आयपीएलचा हंगाम सुरू असल्यानं सगळीकडं क्रिकेटचा फिव्हर पसरलेला पाहायला मिळतोय. भारतीय क्रिकेटमध्ये सध्या चाहत्यांचा सर्वात लाडका कोण असा प्रश्न केल्यास खरं तर त्याचं वेगळं उत्तर शोधायची गरज नाही.

आपसूकच महेंद्रसिंह धोनी हे नाव समोर येतं. बरं महेंद्रसिंह धोनी हा अनेकांचा चाहता असू शकतो. पण धोनीच्या सर्व चाहत्यांना सर्वाधिक आवडलेला त्याचा शॉट कोणता असं विचारलं तर. तर याचंही उत्तर वाटतं तेवढं अवघड नाही. कारण 2011 च्या विश्वचषकात भारतासाठी चषक जिंकून देणारा धोनीचा तो षटकार (dhoni world cup winnig six) कोणीही विसरू शकत नाही.

अगदी धोनीचे चाहतेच काय पण प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या मनात तो क्षण कायमस्वरुपी कोरला गेला आहे. आता धोनीनं ज्या बॅटनं हा शॉट खेळला तीदेखिल खास ठरली आहे. कारण त्या बॅटनं मैदानावर एक विक्रम केला आणि मैदानाबाहेर दुसरा.

dhoni world cup winnig six hitting bat is also get registerd in gunnies record

Leave A Reply

Your email address will not be published.