जमीन खरेदीचा वाद टोकाला, दोन कुटुंबियांची सिनेस्टाईल हाणामारी

0 22

धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी गावात याबाबतची घटना घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.(Dhule two families Fight due to Land purchase dispute)

 

धुळे : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील वाडी गावात याबाबतची घटना घडली आहे. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (Dhule two families Fight due to Land purchase dispute)

शिरपूर तालुक्यातील वाडी या गावात दोन कुटुंबियांमध्ये गेल्या 17 वर्षांपासून जमीन खरेदीवरुन वाद सुरु होता. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला वाद टोकाला पोहोचला होता. मात्र काही दिवसांपूर्वी या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी जमिनीच्या वादावरुन सिनेस्टाईल हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाली.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या हाणामारीत दोघ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर धुळे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सध्या या सिनेस्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.