कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस आमनेसामने; काँग्रेसने रोखली सेनेची एक कोटींची कामे

शिवसेनेच्या जिल्हापरिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून जिल्हापरिषदेतील काँग्रेस आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. पदाधिकारी बदलासाठी राजीनामा द्यायला तयार नसलेल्या शिवसेनेच्या बांधकाम सभापीतींची कामे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी रोखली आहेत.

0 2

कोल्हापूर: शिवसेनेच्या जिल्हापरिषदेतीलकोल्हापूर  पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून कोल्हापूर जिल्हापरिषदेतील काँग्रेस आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले आहेत. पदाधिकारी बदलासाठी राजीनामा द्यायला तयार नसलेल्या शिवसेनेच्या बांधकाम सभापीतींची कामे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी रोखली आहेत. तब्बल एक कोटींची कामे रोखली आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले असून आता हा वाद मातोश्री दरबारी गेला आहे. (dispute between shiv sena and congress in kolhapur jilha parishad)

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाला वेगळं वळण लागलं आहे. पदाधिकारी बदलासाठी राजीनामा द्यायला तयार नसलेल्या शिवेसनेचे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली एक कोटींची कामे जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांनी रोखली आहेत. ही कामे रोखण्यासाठी बजरंग पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्रंही दिले आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव वाढला आहे.

वाद मातोश्री दरबारी

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने सत्ता मिळवली आहे. मात्र, पदाधिकारी बदलाची वेळ आल्याने शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास चालढकल सुरू केली आहे. त्यामुळे काँग्रेसने संताप व्यक्त केला असून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीतील संबंध ताणले गेले आहेत. शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा म्हणून काँग्रेसने आता थेट मातोश्रीवरून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मातोश्रीतून काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (dispute between shiv sena and congress in kolhapur jilha parishad)

 

Leave A Reply

Your email address will not be published.