जिल्हा शिक्षक पुरस्कार श्रीकृष्ण भटकर यांचा प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार

जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी अपघातग्रस्त असतांनाही केला त्यांच्या कार्याचा सन्मान

0

जळगाव (जामोद ) :

पंचायत समिती जळगांव जामोद अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा वडशिंगी येथे श्रीकृष्ण भटकर कार्यरत आहेत,त्यांनी तालुक्यातील पहिली आय. एस. ओ. गुणवत्ता प्राप्त शाळा करण्यास सहकार्य करून,विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम शाळेमध्ये उत्कृष्टपणे राबविलेले आहेत असे उपक्रमशील शिक्षक श्रीकृष्ण भटकर यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने देण्यात येणारा सन २०२०-२०२१ चा जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे.
शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव व सन्मान व्हावा,कौतुक व्हावे व पुढील वाटचालीस शिक्षकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने सहाय्यक अध्यापक श्रीकृष्ण भटकर यांचा जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे हे अपघातग्रस्त असतांनाही सपत्नीक सहपरीवाराच्यावतीने व प्रहार शिक्षक संघटनेच्यावतीने श्रीकृष्ण भटकर यांचा त्यांच्या निवासस्थानी शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन व औक्षण करून सन्मान केला.
याप्रसंगी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा संघटक गजानन दराडे व आदि पदाधिकारी सन्मान करण्यासाठी उपस्थित होते असे तालुकाध्यक्ष सुनिल घावट यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण वासुदेव भटकर यांचा सत्कार करतांना सपत्नीक जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे

अपघातग्रस्त असतांनाही माझा सन्मान महाराष्ट्र राज्य जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे यांनी त्यांच्या सहपरीवाराने तसेच जिल्हा प्रहार संघटनेच्यावतीने केलेला हा सन्मान भविष्यात माझ्यासाठी व माझ्या शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणादायी आहे.

– श्रीकृष्ण भटकर
जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक

Leave A Reply

Your email address will not be published.