जिल्हयातील शिक्षकांची चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीची प्रतिक्षा संपली,३४२ शिक्षकांना चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी लागू

शिक्षक सेनेच्या न्यायिक मागणीला व पाठपुराव्याला यश

0 96

बुलडाणा :
जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ५४२ शिक्षकांनी नियमित सेवेची अखंड १२ वर्ष सेवाकाळ पूर्ण केल्यामुळे अखेर सदर शिक्षकांना चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी लागु करण्यासंदर्भातील मार्ग झाला मोकळा झालेला आहे.

जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या ५४२ पैकी २०० सहाययक शिक्षक,पदवीधर शिक्षक,केंद्रप्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, निवडश्रेणी सहाय्यक अध्यापक तसेच विद्यालयामध्ये कार्यरत असलेले शिक्षक यांचा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.
काही शिक्षकांना यापूर्वीच वरीष्ठ वेतनश्रेणी लागू झाल्याबाबतचा आदेश निर्गमित झालेला असून उर्वरित ३४२ शिक्षकांना २३ एप्रिलच्या आदेशानुसार चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीची समस्या मार्गी लागलेली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या माध्यमातून या विषयासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता.या विषयी सहकार्य करणाऱ्या मा.निवड समिती,प्रशासन,शिक्षण समिती सदस्य यांनी सात्यत्याने पाठपुरावा केलेला आहे.

यामध्ये प्रामुख्याने विदर्भ प्रांताध्यक्ष प्रमोद पवार,जिल्हा संपर्क प्रमुख रवि वाघ ,जिल्हाध्यक्ष महेंद्र रोठे, जिल्हा सरचिटणीस प्रविण वायाळ,कार्याध्यक्ष सुनिल जाधव जिल्हा उपाध्यक्ष मंगेश भोरसे व आदी पदाधिकारी यांनी सदर समस्या निकाली काढण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनिल घावट व देविदास बडगे या एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्हयातील कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षक,केंद्र प्रमुख,उच्चश्रेणी मुख्याध्यापक व विद्यालयीन असलेल्या शिक्षकांचा बारा वर्षे सेवा काळ पुर्ण झालेला असल्यामुळे त्यांची चट्टोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणी लागु करण्यासंदर्भातील समस्या ही जिल्हास्तरावर प्रलंबित होती, शिक्षक सेनेच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून सदर समस्या निकाली काढण्यासाठी शिक्षक सेनेला एक मोठे यश आता प्राप्त झालेले आहे.

– मंगेश भोरसे
जिल्हा उपाध्यक्ष,म.रा.शिक्षक सेना बुलडाणा

Leave A Reply

Your email address will not be published.