मुख्यमंत्री महोदय बोलण्यापूर्वी थोडा अभ्यास करा; एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
मुंबई : महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्ण संख्या बघता मंगळवारी रात्री ८:३० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी १५ दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच या लाईव्हच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि अर्थसहाय्य देण्यात येईल अशी माहिती दिली. दरम्यान यावेळी त्यांनी दिलेल्या आकडेवारीवरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना चांगलेच कात्रीत धरले आहे.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विट हँडल वरून एक ट्विट करत म्हणाले की, “महाराष्ट्राची लोकसंख्या सध्या १२ कोटी आहे. या १२ कोटी लोकसंख्येपैकी अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी ७ कोटी कसे आहेत? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा? मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार आणि बोलण्यापूर्वी थोडा अभ्यास केलात तर बरं होईल.” अशा घणाघाती शब्दात अतुल भातखळकरांनी ठाकरे सरकारचे चांगकीच कान उघडणी केली आहे.

दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देणारे ५,४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.