या मेसेजवरून चुकूनही करू नका क्लिक, मोबाईलमधून सारा डेटा होऊ शकतो डिलीट

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच सीओएआयने बुधवारी सोशल मीडियावर पसरत असलेल्या या खोट्या संदेशांबद्दल इशारा जारी केला आहे. लोकांना या मेसेजपासून सतर्क राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

0 23

नवी दिल्ली – सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (Cellular Operators Association of India) म्हणजेच  सीओएआयने  (COAI) बुधवारी सोशल मीडियावर (social media) सध्या पसरत असलेल्या  संदेशांपासून (messages) सावध (alert) राहण्याचे  आवाहन (appeal) लोकांना केले आहे. त्यांनी इशारा (warning) दिला आहे की सोशल मीडियावर असे अनेक खोटे मेसेज सध्या फिरत आहेत ज्यात असा दावा (claim) केला गेला आहे की सरकारने (government) 100 मिलियन उपभोक्त्यांना (consumers) ऑनलाईन  शिक्षणासाठी (online education) मोफत रीचार्ज योजनेचे (free recharge scheme) वचन (promise) दिले आहे.

सीओएआयने लोकांना सांगितले आहे की अशा लिंकवर (link) क्लिक (click) केल्यास मोबाईल डिव्हाईजमधून (mobile device) डेटा (data) आणि  माहिती (information) चोरीला (theft) जाऊ शकते आणि याचे इतरही गंभीर परिणाम (serious effects) होऊ शकतात.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा खोटा मेसेज

COAI, scam alert, scam, viral message, Cellular Operators Association of India

लोकांना केले सतर्क राहण्याचे आवाहन

सीओआयएने दिलेल्या माहितीनुसार काही धोकेबाज लोक सोशल मीडियाद्वारे या मंचांवर खोटे मेसेज प्रसारित करत आहेत. यात असा दावा केला जात आहे की सरकारने 100 मिलियन उपभोक्त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत रीचार्ज योजनेचे वचन दिले आहे. या मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे.

मोबाईलमधून चोरीला जाऊ शकते माहिती आणि डेटा

सीओएआयने अशा मेसेजपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले आहे की कोणाला असा मेसेज आल्यास लोकांनी अशा लिंकवर क्लिक करू नये, कारण यामुळे मोबाईलमधील माहिती आणि डेटाची सूचना चोरी करणाऱ्यांना मिळू शकते आणि याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. अशा प्रकारचे मेसेज हटवण्यास आणि त्याकडे लक्ष न देण्यानेच आपण या संकटाशी एकत्र लढू शकतो आणि इतरांची फसवणूक होण्यापासून रोखू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.