धक्कादायक! इथे कंपाउंडरच बनला डॉक्टर; बोगस डिग्री समोर येताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अन्..

0 2

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
नांदेड : पुणे जिल्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडलेला समोर आलेला आहे. इथे एक कंपाउंडर डॉक्टर बनून स्वतःचे हॉस्पिटल चालवत असल्याची बाब समोर आली आहे. मुख्य म्हणजे या डॉक्टरकडे बनावट डिग्री आणि स्वतःचे नाव बदलल्याचे समोर आले आहे.

मूळचा नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी असलेला कंपाउंडर मेहबूब शेख पुण्यात येऊन बनावट डिग्री तयार करून स्वतःचे २२ बेडचे हॉस्पिटल चालवत होता. हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरु आहे.

मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कपांऊडरचे बोगस डिग्री आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, कंपाउंडर मेहबूब शेख यांच्याकडे बनावट डिग्री आणि नाव बदललेली कागदपत्रे कुठून आली? याचा पोलीस तपास करत आहेत. याशिवाय या बोगस डॉक्टरने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केले आहेत. तर काहींवर अजूनही सुरु आहेत. मात्र त्याने उपचार करताना केलेली लुटालूट रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर आणणारी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.