काय सांगता! डोनाल्ड ट्रम्प मारुती 800 कारने येणार हिमाचल प्रदेशमध्ये? ई-पास पाहून पोलिसही हैराण

0 19
या पासनुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh bachchan) शिमलामध्ये (Shimla) येत आहेत. हे दोन्ही ई पास सध्या चांगलेच व्हायरल (Viral) झाले आहेत.

नवी दिल्ली 08 मे : हिमाचल प्रदेशमधून (Himachal Pradesh) एका आश्चर्यचकीत करणारी बातमी समोर आली आहे. इथे शिमला प्रशासनाचे दोन ई पास (E Pass) सध्या चर्चेत आहेत. कारण या पासनुसार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन ( amitabh bachchan) शिमलामध्ये (Shimla) येत आहेत. हे दोन्ही ई पास कोरोना संकटाच्या काळात शिमला प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा करणारे आहेत. विरोधी पक्षानंही या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

असं सांगितलं जात आहे, की हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता राज्य सरकारनं राज्यात येणाऱ्यांसाठी ई रजिस्ट्रेशन सक्तीचं केलं आहे. मात्र, आता यामुळे सरकारच्या व्यवस्थेवर आणि कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याठिकाणाहून असे दोन ई पास समोर आले आहेत, ज्यानुसार अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन शिमलामध्ये येत आहेत. या पासची व्हॅलिडिटी सात मे लिहिली गेली आहे.

ई पासवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सात मेपर्यंतच्या काळात डोनाल्ड ट्रम्प चंदीगडहून शिमलामधील सुन्नी येथे येत आहेत. या पासला आवश्यक सेवा म्हणून परवानगी दिली गेली आहे. गाडीवर चंदीगडचा नंबर आहे. मात्र, गाडीच्या मॉडेलचं नाव वाचून तुम्हीही हैराण व्हाल. ज्या गाडीमध्ये ट्रम्प चंदीगड ते शिमला असा कथित प्रवास करणार होते, ती गाडी आहे मारुती 800. तर, दुसरा पास आहे अमिताभ बच्चन यांचा.

हे दोन्ही ई पास सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. विरोधा पक्षानं या मुद्द्यावरुन सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करत गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. हिमाचल प्रदेश पोलिसांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत म्हटलं, की शिमला पोलिसांना फेक ई पास बनवले गेल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.