आर्थिक दुर्बल घटक : ‘ एनएमएमएस ’ शिष्यवृत्तीसाठी ‘ जि.प.शाळा कठोरा येथील दोन विद्यार्थींनी पात्र
शेगांव:
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेच्या परीक्षेत जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थींनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या आहेत. शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये झालेल्या या परीक्षेत ६ विद्यार्थ्यांपैकी २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे पुढील चार वर्षासाठी अठ्ठेचाळीस हजार मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहेत.
या विद्यार्थ्यांमध्ये कु.अंजली गजानन खवले व कु.सोनाली ज्ञानेश्वर वाघ या विद्यार्थीनीचा समावेश आहे सदर विद्यार्थींनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत सुयश संपादन केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ,भूमिती कंपास,रजिष्टर,पेन या भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिक सचिन वडाळ,सुरेश डोसे,संजय महाले,पुरूषोत्तम सपकाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी या शिक्षकांचे तसेच वेळोवेळी गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे,तात्कालिक गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात,शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके व उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थींनी मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रविण गवळी,सदस्य राजु इंगळे, पालक अविनाश जाधव,विशाल लोणे यांनी याप्रसंगी विद्यार्थींनीची अभिनंदन व कौतुक केले आहे.
शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थीनीचा सन्मान करतांना शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षकवृंद