SBI बँकेची मेगाभरती रद्द; परीक्षार्थींना फी मिळणार परत!

स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 8500 अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा केलीय. 20 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेने 8500 अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविले होते.

0 46

SBI Recruitment 2021 Cancelled : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 8500 अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा केलीय. 20 नोव्हेंबर 2020 रोजी बँकेने 8500 अ‍ॅप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविले होते. मात्र, ही भरती बँकेने रद्द करत असल्याची नुकतीच घोषणा केली असून अर्जदारांची अर्ज फी परत देण्यात येणार असल्याचेही बँकेने स्पष्ट केलेय. (SBI Recruitment 2021 Cancelled SBI Cancels Apprentice Recruitment 2020 On 8500 Posts sbi co in)

ही भरती प्रक्रिया रद्द करण्याबाबत एसबीआयने (SBI) एक नोटीस प्रसिध्द केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे, की जाहिरात अधिनियम 1961 अन्वये अॅप्रेंटिसची नेमणूक करण्याची प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2020 रोजी रद्द करण्यात आलीय. मात्र, या जाहिरातअंतर्गत फी भरलेल्या सर्व उमेदवारांना फी परत मिळणार आहे.

दरम्यान, बॅंकेने SBI Apprentice recruitment process 2021 अंतर्गत 6100 अॅप्रेंटिस पदांसाठी नवीन अर्ज मागविले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट – sbi.co.in वर अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 26 जुलै रोजी ती संपणार आहे, तर ऑगस्ट 2021 मध्ये ही परीक्षा होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.