शेगांव तालुक्यातील कठोरा येथे कोरोना संसर्गाबबत प्राथमिक लक्षणे तपासणी कुटुंब सर्वेक्षण

0 22

शेगांव :
वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी कठोरा येथे गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुटुंबनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे.सर्वेक्षणात गावातील कोणीआजारी आहे का ? कोणाला घसा दुखणे, सर्दी,ताप आहे का ?याविषयी माहिती घेण्यात येत आहे अशी लक्षणे आढळणाऱ्यांना क्वॉरंटीन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सदर सर्वेक्षण अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस,जिल्हा परिषद शिक्षक यांच्यावतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सदर सर्वेक्षण आशा वर्कर लताताई कठोरकार,अंगणवाडी सेविका कोकिळाताई खवले,जयाताई खवले,यमुनाबाई गवळी,उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट,सचिन वडाळ,सुरेश डोसे,संजय महाले,पुरूषोत्तम सपकाळ,सचिन गांवडे,अर्जुन गिरी आदी करत असुन सदर सर्वेक्षणाकरिता स्वस्त धान्य दुकानदार बाबुराव खवले यांचेही सहकार्य लाभत आहे.

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी कुटुंब सर्वेक्षण करतांना शिक्षक,आशा वर्कर व अंगणवाडी कर्मचारी

 

कोरोना संसर्गासंदर्भात माहिती भरतांना अंगणवाडी सेविका व शिक्षक सचिन वडाळ

Leave A Reply

Your email address will not be published.