‘RSSची मदत दिसली नाही का?’; काँग्रेस नेत्याचं कौतुक करणारा फरहान अख्तर होतोय ट्रोल

0 22

मुंबई फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता, दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. चित्रपटांसोबतच तो सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. देशभरात घडणाऱ्या विविध घटनावर तो रोखठोकपणे प्रतिक्रिया देतो. यावेळी त्यानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी वी (Srinivas BV) यांचं कौतुक केलं. त्यांच्या कामाची पद्धत फरहानला प्रचंड आवडली होती. मात्र त्याच्या कौतुकामुळं काही नेटकरी नाराज झाले आहेत. “तुला काँग्रेसचीच मदत बरी दिसली, आरएसएसने केलेली मदत नाही दिसली” असं म्हणत त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे.

श्रीनिवास बी वी यांनी आपल्या 1 हजार कार्यकर्त्यांच्या मदतीनं आतापर्यंत हजारो कोरोना रुग्णांची मदत केली आहे. त्यांनी अनेकांना रुग्णालयात बेड उपलब्ध करुन दिले. ऑक्सिजनसाठी आर्थिक मदत केली. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांमुळं संघर्ष करणाऱ्या रुग्णांना देखील त्यांनी उपचारासाठी मदत केली. सध्या त्यांच्या कार्यशैलीचं सर्वत्र कौतुक होत आहे. अभिनेता फरहाननं देखील त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. “मी आजवर तुम्हाला भेटलेलो नाही. पण कोरोना संपताच मी नक्कीच तुम्हाला भेटेन आणि तुम्हाला मीठी मारेन.” अशा आशयाचं ट्विट त्यानं केलं होतं.

मात्र हे ट्विट पाहून काही नेटकरी संतापले आहेत. “श्रीनिवास बी वी यांनी कौतुक करण्यासारखं असं काहीही केलेलं नाही. असे अनेक लोक आहे जे कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता लोकांची मदत करतायेत. अगदी RSS देखील शांतपणे लोकांची मदत करतेय पण त्यांचं कौतुक कधी फरहान अख्तरनं केलं नाही. मात्र काँग्रेसचं कौतुक करण्यासाठी तो पुढे आला.” असं मत काही नेटकरी व्यक्त करत आहे. शिवाय या ट्विटसाठी त्याला जोरदार ट्रोल देखील केलं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.