शेतातच शेतमजुराचा मृत्यू

0 100

चिमूर :
शंकरपूर येथून जवळच असलेल्या हिरापूर येथे एका शेतमजुराचा शेतावरच मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली आहे हिरापूर येथील किसन चीडाम 75 हे शेतमजूर दुसऱ्याच्या शेतावर रोवणी च्या कामासाठी सकाळीच घरून निघून गेले परंतु ज्या शेतावर जायचे होते त्या शेतावर ते पोहचले नाही त्या शेतावर उमेश देशमुख यांच्या शेतातून जावे लागते त्या शेतातील धान बांधीत मृतावस्थेत आढळून आले त्या शेताच्या बाजूने रोवणी सुरू होते रोवणी आटोपल्यावर बाजूच्या शेतातील शेतमजूर आपल्याला घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना हे प्रेत दिसून आले या घटनेची माहिती शंकरपूर येथे पोलीस चौकी ला दिली असून प्रेत शवविच्छेदनासाठी चिमूर येथे पाठविण्यात आलेले आहे अधिक तपास शंकरपूर पोलिस चौकीचे कर्मचारी करीत आहे या घटनेबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे

हिरापूर येथील किसन चिडाम मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या पिकप वाहनाचा मालेवाडा जवळील डांबर प्लॉन्ट जवळ अपघात..

Leave A Reply

Your email address will not be published.