अखेर रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रश्नी मार्गी लागला! इंजेक्शनाचा काळाबाजार बघता सरकारने घेतला मोठा निर्णय

0 0

प्रतिनिधी:- निवास गायकवाड
नवी दिल्ली : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना दिसत आहे. अशातच कोरोना उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा सर्वत्र जाणवत आहे. तसेच या इंजेक्शनचा सर्वत्र काळाबाजार सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता यासंदर्भात भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

देशात कोरोना स्थिती सुधारत नाही तो पर्यंत भारत सरकारने रेमडेसिविर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. मागणी वाढल्याने रेमडेसिविर इंजेक्शनच्या किंमती देखील वाढवल्या जात असल्याचे पाहून हा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. तसेच, रेमडेसिविर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार पाहून जिल्हास्तरावर कंट्रोल रूम तयार केल्या जाणार आहे. त्या संबंधित सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहे.

दरम्यान, स्थानिक कंपन्या ज्या रेमडेसिविर इंजेक्शनचं उत्पादन करतात, त्यांना इंजेक्शनच्या साठ्याविषयीची माहिती वेबसाईटवर ठेवावी लागणार आहे. तसेच कोणत्या डीलरकडून वितरण झालं आहे, याचीही माहितीही कंपन्यांना द्यावी लागणार आहे. तर औषध निरीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्याविषयी सातत्याने माहिती द्यावी लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.