मुंबई : भायखळा परिसरातील लाकडी गोदामाला भीषण आग

0

मुंबईतील भायखळा परिसरातील मुस्तफा बाजारजवळील एका लाकडी गोदामाला पहाटे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्यापर्यंतर तरी कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

आज सकाळी ६ वाजता लागलेली आग आटोक्यात आली आहे. कोणतीही दुखापत किंवा अपघाताची नोंद नाही; आग विझवण्याचे काम अद्याप सुरू आहे. अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी के डी घाडीगावकर यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.