विदर्भासह देशभरात पाच दिवस पावसाचे

- हवामान खात्याचा इशारा

0 0

नवी दिल्ली : वातावरणातील चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचे राहणार आहेत. काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडेल. विदर्भातील बहुतांश भागांनाही हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे.

दक्षिण द्वीपकल्पावर वार्‍यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या प्रभावाने पावसाची दाट शक्यता आहे. या पाच दिवसांच्या काळात वार्‍यांची गती ताशी 40 किलोमीटर इतकी राहील.

तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागांमध्ये वादळी वार्‍यांसह पाऊस पडेल. मध्यप्रदेशच्या वायव्येकडेही आणखी एक चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे. त्याच्या प्रभावाने मध्यप्रदेश, विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड, बंगाल आणि ओडिशा यासारख्या ठिकाणी आज रात्रीपासूनच पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

याशिवाय, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबाद येथेही जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.