वीकेंड लॉकडाऊनला नागरिक व व्यापारांचा उत्तम प्रतिसाद – शंकरपूर

अत्त्यावशक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद

0 8

शंकरपूर :

राज्यात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढल्याने राज्यसरकारने कोरोनावर आळा घालण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत वीकेंड लॉकडाऊन जाहिर केला होता, शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय प्रतिष्ठान बंद ठेवन्याचे आदेश राज्य सरकार ने दिले होते, शनिवार आणि रविवार पहिल्या वीकेंड लोकडॉऊनला परिसरात व तालुक्यात उत्सपुरत प्रतिसाद मिळाला, चिमुर तालुक्यात सर्वत्र रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.

राज्य शासनाने लागू केलेल्या वीकेंड लॉकडाऊनला शंकरपूरात उत्तम प्रतिसाद दिला, व्यापारीनी आपआपली प्रतिष्ठाने बंद ठेवली, नागरिकांनी सुधा घराबाहर जाने ठाळले होते.

आरोग्य सेवा वगळता दुकाने, आस्थापना व सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले असल्याने रस्ते ओसाड़ आणि निर्मानुष्य झाले होते, कड़क लाँकडॉऊन कोरोनाची साख़ळी तोडन्यासाठी महत्वाची ठरेल असा अंदाज व्यक्त होत आहे, तालुक्यातील शंकरपुर परिसरातील गावात वीकेंड लाँकडॉऊन उत्तस्फुरतपने पाळन्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.