राहुल द्रविडवर खळबळजनक आरोप; ग्रेग चॅपल म्हणाले, आमच्याकडून…

राष्ट्रीय संघासाठी सातत्याने युवा खेळाडू उपलब्ध करून देण्याची कल्पना राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाकडून शिकल्याचा आरोप ग्रेग चॅपल यांनी केला.

0 45

मुंबई: भारताच्या राष्ट्रीय संघासाठी दर्जेदार खेळाडू तयार करणाऱ्या राहुल द्रविड याच्यावर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेल्या द्रवीडवर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज माजी खेळाडू ग्रेग चॅपल यांनी आरोप केला आहे की, द्रविडने आमच्याकडून (ऑस्ट्रेलिया) शिकून भारतातील देशांतर्गत क्रिकेट मजबूत केले.

क्रिकेट.कॉम.एयूशी बोलताना चॅपल म्हणाले, भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाकडून देशांतर्गत क्रिकेटसाठीचा ढाचा तयार केला, जो राष्ट्रीय संघासाठी सातत्याने खेळाडू देत आहे. अर्थात ऑस्ट्रेलियाला या गोष्टीची कमतरता जाणवत आहे.

युवा प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यात भारत आणि इंग्लंड या दोन देशांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. त्यांनी खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

भारताने यश मिळवले. हे यामुळेच शक्य झाले कारण द्रविड आमच्याकडून शिकला आणि आम्ही बघा काय करतोय. भारताकडे अधिक पर्याय होते, असे चॅपल म्हणाले.

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांमध्ये चॅपल यांचा समावेश होतो. देशांतर्गत ढाचा ठिक नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंना त्याच्या करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. युवा खेळाडूंना तयार करण्यात आपण सर्वत्तम होतो. व्यवस्था त्यांना जोडून ठेवायची पण मला वाटते की गेल्या काही वर्षात यात बदल झाले आहेत.

मी असे अनेक खेळाडू पाहिले आहेत ज्यांच्याकडे प्रतिभा आहे पण संधी मिळाली नाही. मला वाटते ऑस्ट्रेलियाने ही संधी गमावली की ते स्वत:ला सर्वश्रेष्ठ म्हणू शकतील. आता इंग्लंड आपल्यापेक्षा छान करत आहे आणि भारत देखील उत्तम कामगिरी करत आहे.
या वर्षी महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारताच्या दुय्यम संघाने ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत केले. भारताने खेळाडू तयार करण्याची एक व्यवस्था असून त्यांच्या युवा खेळाडूंकडे आंतरराष्ट्रीय अनुभव देखील असल्याचे ते म्हणाले.
ब्रिसबेन कसोटी खेळणारा भारतीय संघ पाहिला तर यात चार खेळाडू नवे होते. सर्वांनी मान्य केले होती की हा भारताचा दुय्यम संघ आहे. हे सर्व जण भारत अ कडून अनेक सामने खेळले आहेत. पण ते फक्त भारतात नाही तर विविध परिस्थितीत खेळले आहेत. त्यामुळे त्यांना जेव्हा खेळवण्यात आले तेव्हा ते अगदी नवखे नव्हते. ते आंतरराष्ट्रीय क्रिकटपटू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.