यांना कोणीतरी आवरा रे! मक्याच्या शेतातून बँड-बाजासह मंडपात पोहोचला नवरदेव, VIDEO पाहून नाही आवरणार हसू

0 144

मुंबई: मागील काही दिवसांपासून भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) झपाट्यानं वाढत आहे. देशात दररोज 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण (Corona patient) आढळत आहेत. त्यामुळे देशात ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. तसेच लग्न आणि इतर समारंभासाठी परवानगी (marriage in lockdown) घ्यावी लागत आहे. काही लग्नांना परवानगी दिल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गर्दी करून कोरोना नियमांचा फज्जा उडवला जात आहे. तर काहींनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन विवाह आणि इतर समारंभ पुढे ढकलले आहेत.

अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये एक लग्न अत्यंत विचित्र पद्धतीनं पार पडल्याचं दिसत आहे. याठिकाणी कोरोना नियमांचं आणि लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी नवरदेवाची वरात थेट शेतातूनच काढली आहे. बँड, बाजा वाजवणारी मंडळी शेतातीतील सरीतून पुढे चालत आहेत. तर त्या पाठीमागे वऱ्हाडी आणि नवरदेव चालताना दिसत आहे. कोरोना विषाणूचा धसका घेऊन अशापद्धतीनं वरात काढल्यामुळे हे लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये ‘मजेदार वरात’ असं लिहिलं आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहु शकता की, नवरा मुलगा बँड-बाजासह मक्याच्या शेतातून येत आहे. एवढंचं नव्हे तर, त्याच्यासोबत लहान मुलं, स्त्रिया आणि अन्य लोकंही दिसत आहेत. शिवाय वऱ्हाडी मंडळी देखील सजलेली आहे. वाजंत्रीही आपल्या धुंदीत जबरदस्त ताल पकडला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आता वेगानं व्हायरल होतं आहे.

आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास 35 हजार लोकांनी पाहिलं आहे, तर अडीच हजाराहून अधिक लोकांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. यानंतर आता अनेक वापरकर्त्यांनी यावर मजेदार प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.