कठोरा केंद्रातील शाळांना गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांची शाळाभेट

0

शेगांव : 
पंचायत समिती अंतर्गत असलेल्या कठोरा केंद्रातील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा कठोरा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कालवड या शाळांना दि.३० जुलै रोजी शाळा भेट दिली आहे.

याप्रसंगी शाळेतील वर्गांना भेट देऊन विद्यार्थ्याना वाचन,लेखन व प्रश्न विचारून गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना मार्गदर्शन केले.आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत प्रश्न मंजुषा,गायन स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,पोष्टर बनविणे आदी परिपत्रकानुसार प्रभावीपणे उपक्रम राबविण्यासंदर्भात सुचित केले.

याप्रसंगी शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक सुनिल घावट व शिक्षक सुरेश डोसे,सचिन वडाळ,सचिन गावंडे,अर्जुन गिरी,संजय महाले यांनी गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी कार्यालयीन प्रतिनिधी विषय शिक्षक राहूल ससाने,विनोद वैतकार हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.