स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जि.प.शाळा कठोरा येथे शालेय विद्यार्थ्यांचे व ग्रामस्थांचे सामुहिक राष्ट्रगीताचे गायन
जि.प.शाळेमध्ये दि.९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रमाचे आयोजन
शेगांव :
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत
असल्याच्या पार्श्वभुमिवर गटविकास अधिकारी सतिष देशमुख व गटशिक्षणाधिकारी एस.डी.वायदंडे यांच्या मार्गदर्शनानुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जि.प. शाळांमधुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सामुहिक राष्ट्रगान,स्वच्छता मोहिम,वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती करणे,राखी बनविणे,वृक्षांना राखी बांधणे,चित्रकला स्पर्धा,रेखाटने स्पर्धा,निबंध स्पर्धा,देशभक्तीपर कार्यक्रम,सांस्कृतिक व गीत गायन कार्यक्रम,हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत जनजागृतीसाठी फेरी काढणे,स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभातफेरी काढणे, स्वातंत्र्यदिनावर घोषवाक्य तयार करणे, विदयार्थ्याना ध्वजसंहिता सांगणे,स्वराज्य फेरीचे आयोजन करणे. विदयार्थ्याना देशभक्तीपर चित्रपट दाखविणे.आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त ९ ऑगस्ट रोजी जि.प.शाळा कठोरा येथे सामुहिक राष्ट्रगीताचे गायनाचा उपक्रम बहुसंख्य गावक-यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पाडण्यात आला.
या प्रसंगी सरपंच,ग्राम पंचायत सदस्य,ग्रामसेवक,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,मुख्याध्यापक,शिक्षक, अंगणवाडी सेविका व मदतनीस,आशा वर्कर,ग्रामपंचायत परिचारक,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.